|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थ्यांकडून पश्चिम महाराष्ट्रातील बुध्द लेण्यांचे संशोधन

विद्यार्थ्यांकडून पश्चिम महाराष्ट्रातील बुध्द लेण्यांचे संशोधन 

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हय़ासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तथागत गौतम बुध्द तसेच सम्राट अशोककालीन लेणी आहेत. मुंबई विद्यापीठातील पाली अधिविभागाकडून या लेण्यांचे संशोधन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाली अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱयात या लेण्यांना भेटी देवून माहिती घेतली. या अभ्यास दौऱयात अनेक गोष्टी उजेडात येत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा बौध्द-अवशेष व विचार संवर्धन समितीचे अध्यक्ष टी. एस. कांबळे  यांनी दिली आहे.

मुंबई विद्यापीठातील पाली अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी कराड येथील जखनवाडी व कोल्हापूरातील पोहाळे येथील लेण्यांना भेट दिली. या भेटी दरम्यान दुसऱया शतकातील गौतम बुध्दांच्या तत्वज्ञानावर आधारीत लेणी, स्तूपांचा अभ्यास केला. यामध्ये 92 विद्यार्थ्यांसह विभागप्रमुख डॉ. योजना भगत, मेघा तायडे व नुतन यांचा समावेश होता. स्तूपांच्या पायाला मेदी (शिल्प) समजले असून, मेदीच्यावरील अंडाकृती भागास समाधीस्थळ समजले जाते. स्तूपावर सूर्यकिरणे पडतील अशी या स्तूपांची रचना आहे. कराड येथील 64 स्तूपांच्या नोंदीचा दस्तऐवज भारतीय पूरातत्व खात्यात उपलब्ध आहे. या स्तूपांमध्ये सेल व चैत्यग्रह, बाहेर पिण्याच्या पाण्याचा हौद व हातपाय धुण्याची सुविधा आहे. बाहेरच्या बाजूला कोरीव खांब आहेत. तर जखनवाडी येथील लेण्यावर चक्र व सिंह कोरलेले आहेत. सांगली येथील कुकटोळ येथील गिरलींग डोंगरातील लेणी स्तूप व चैत्यग्रह आहे. कोल्हापूर जिल्हा बौध्द-अवशेष व विचार संवर्धन समितीच्या वतीने डॉ. योजना भगत या जागतिक पातळीवरील लेण्यांचा अभ्यास करीत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टी. एस. कांबळे, बापुसाहेब कांबळे, अजित कांबळे, सिध्दार्थ वाघमारे, प्रविण कांबळे, रमेश कांबळे, अनिल कांबळे, जयपाल चावरे आदी उपस्थित होपे.

Related posts: