|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई

वेळेत विद्युत समस्या न सोडविणाऱया अधिकाऱयांवर होणार दंडात्मक कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटक राज्य विद्युत नियामक मंडळ (केईआरसी) च्या नियमावलीनुसार ग्राहकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्युत कर्मचाऱयांनी ग्राहकांनी मांडलेल्या समस्यांचे वेळेत निवारण करणे बंधनकारक आहे. परंतु वेळेत कामे पूर्ण न करणाऱया अधिकाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्याचा नियम केईआरसीच्या नियमावलीत असल्याने अधिकाऱयांनी ग्राहकांच्या समस्या वेळेत निवारण कराव्यात, असा आदेश केईआरसीचे राज्य विद्युत ओंबुड्समन एस. एस. पट्टणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील विद्युत समस्यांचा आढावा घेण्यासाठी केईआरसीच्यावतीने प्रत्येक जिल्हावार आढावा बैठक घेण्यात येत आहे. मंगळवारी या बैठकीसाठी एस. एस. पट्टणशेट्टी बेळगावमध्ये आले होते. यावेळी बेळगाव विभागाचे चिफ इंजिनियर मनोहर बेवीनमार, केईआरसीच्या तक्रार निवारण समितीचे सदस्य एम. जी. प्रभाकर उपस्थित होते.

जिल्हावार सीजेआरएफची नेमणूक

सध्या राज्यातील विद्युत पुरवठा कंपन्यांमध्ये एकच सीजेआरएफची (तक्रार निवारण सदस्य समिती) नेमणूक करण्यात आली होती. परंतु कंपनीचा एकूण विस्तार पाहता तक्रारी निवारण करणे थोडे कठीण जात होते. यासाठी केईआरसीच्या नियमावलीत बदल करून प्रत्येक जिल्हावार सीजेआरएफची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हय़ाचे चिफ इंजिनियर, इतर अधिकारी व एक नियुक्त सदस्य या समितीमध्ये असणार आहे. या समितीसमोर नागरिकांच्या समस्या मांडण्यात येणार आहेत.

Related posts: