|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » गुगलच्या 20व्या वाढदिनी खास डूडल

गुगलच्या 20व्या वाढदिनी खास डूडल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सर्च इंजिन गुगलचा आाज 20 वा वाढदिवस आहे. प्रत्येकाला डूडलद्वारे हटके शुभेच्छा देणाऱया गुगलने स्वतःच्या बर्थडेलाही तसंच जबरदस्त व्हिडीओ डूडल केलं आहे. नेहमीच नाविन्यपूर्ण कल्पना अंमलात आणून, यूजर्सला नवनव्या गोष्टींची ओळख करुन देणाऱया गुगलने, डूडलद्वारे आपला 20 वर्षांचा प्रवास दाखवला आहेगुगलने 20 वर्षांच्या काळात सातत्याने नवनवे बदल केले. आज बर्थ डेनिमित्त गुगलने स्वतःचं डूडल साकारत, गेल्या 20 वर्षातील संस्मरणीय डूडलचा संग्रह सादर केला. हे डूडल गुगलच्या जुन्या आठवणीत घेऊन जातं.

 

स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीतील दोन विद्यार्थ्यांनी 27 सप्टेंबर 1998 रोजी नवे सर्च इंजिन लॉन्च केले होते. जगभरातील माहितीचा खजिना सर्वांसाठी खुला व्हावा असा त्यांचा हेतू होता. हा खजिना गुगल म्हणून नावारुपाला आला.गुगल हे जगातील टॉप सर्च इंजिन आहे. जवळपास 150 भाषांमध्ये गुगल उपलब्ध आहे. जगातील 190 हून अधिक देशांमध्ये त्याचा विस्तार आहे. 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगल पहिल्यांदा जगासमोर आले होते. लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन यांच्या हस्ते गूगलची स्थापना झाली.