|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राज्य मजूर संघाच्या संचालकपदी उदय जोशी

राज्य मजूर संघाच्या संचालकपदी उदय जोशी 

गडहिंग्लज :

महाराष्ट्र राज्य मजूर संघाच्या संचालक मंडळावर येथील उदय जोशी यांची संचालक म्हणून निवड झाली आहे. या निवडीचे पत्र नुकतेच राज्य अध्यक्ष संजीव कुसाळकर यांनी दिले आहे. जोशी हे गेले 15 वर्षे कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संघाचे संचालक असून गेल्या पाच वर्षापासून चेअरमन म्हणून काम करत आहेत. जिल्हय़ातील, राज्यातील मजूर चळवळीला त्यांनी स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या सहकार्यातून बळ दिले आहे. त्यांच्या निवडीने गडहिंग्लजला त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

Related posts: