|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडय़ांचे वर्चस्व 

जाकिरहुसेन पिरजादे /सोलापूर :

सोलापूर जिह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून गुरूवारी तालुक्याच्या ठिकाणी विविध पक्षाचे आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जिह्यातील 59 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा व इतर पक्षांनी ग्रामपंचायतीवर दावे सांगितले आहेत. विशेषतहा या निवडणुकीत स्थानिक आघाडय़ांचेच वर्चस्व अधिक असल्याचे दिसून येत आहे.

   मंगळवेढय़ात आमदार भारत भालके गटाबरोबरच परिचारक व समाधान आवताडे गटानेही सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचे दावा केला आहे. बार्शीत स्थानिक आघडय़ांचे वर्चस्व दिसून आले. पंढरपुरात भालके गटातील सरपंच विजयी झाल्याचे दावा केला आहे. दक्षिण सोलापूर येथील औज येथे सत्ता परिवर्तन होत बाळासाहेब पाटील यांना धक्का देत सैफन शेख यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. कुडल ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली, मात्र सरपंच माजी आमदार दिलीप माने गटातील झाले आहेत. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या लव्हे गावची सत्ता संपुष्टात आली तर लव्हे गटातही  जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटाचे वर्चस्व राहिले.

 दरम्यान 59 ग्रामपंचायतीच्या 168 सरपंच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होते. गुरूवारी जिह्यातील प्रत्येक तहसील, ग्रामपंचायत कार्यालयात मतमोजणी झाली. 8 च्या सुमारास मतमोजणीस प्रारंभ झाला. मतमोजणीच्या जागी उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या सत्रात जे उमेदवार निवडून आल्याने समर्थकांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. यंदाच्या 59 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठय़ा पक्षांना संमिश्र यश मिळाले तर गावातील स्थानिक आघाडय़ांचे  वर्चस्व दिसून आले.

Related posts: