|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ढवळी येथे कारगाडीने रीक्षाला ठोकरले

ढवळी येथे कारगाडीने रीक्षाला ठोकरले 

प्रतिनिधी /फोंडा :

ढवळी-फोंडा येथील सिंडीकेट बॅकसमोर कारगाडीने पार्क करून ठेवलेल्या प्रवासी रीक्षाला ठोकरल्याने रीक्षाचालकांसह तिघेजण जखमी झाले. राजू नाईक (52, दुर्भाट), लवू कुष्टा गावडे (85,ढवळी), मनोहर शिरोडकर (45,शिरोडा) व श्रीवीणा गणू नाईक (ढवळी) अशी जखमीची नावे आहेत. सदर अपघात काल गुरूवार सायं. 5 वा. सुमारास घडला.

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारचालक महिला निकीता नाईक (35,ढवळी) आपल्या निसान मायक्रा जीए 05 डी 9547 ढवळी टीप टॉप टाईल्स येथून मुख्य रस्त्यावर वळविण्याच्या प्रयत्नात गेंधळलेल्या सरळ गाडी रस्त्याच्या मधोमध हाकत प्रथम शिरोडाहून फेंडय़ाकडे येत असलेल्या एक्टीवा जीए 05 एम 6693 दुचाकीचालक मनोहर याला निसटती धडक दिली. त्यानंतर रस्ता ओलांडून सिंडीकेट बॅकेसमोर पार्क करून ठेवलेल्या ऑटो जीए 01 डब्ल्यू 2098 प्रवासी रीक्षावर जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की यावेळी बेसावध असलेल्या रीक्षात पाठीमागील सिटवर बसलेला चालक राजू बाहेर फेकला गेला. बाहेर पडताना त्याचे डोके संरक्षक भिंतीवर आपटल्याने डोक्याला गंभीर इजा झाली. मात्र सुदैवाने रीक्षाच्या चालकाच्या सिटवर बसलेला ज्येष्ट नागरिक लवू हा कीरकोळ जखमावर बचावला. अन्य दोन जखमीत दुचाकीचालक मनोहर व एक पादचारी युवतीचा समावेश आहे. सर्व जखमीना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून राजू याला प्रकृती अस्वस्थतेमुळे बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले. याप्रकरणी हवालदार विनोद साळूंके यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

     सुदैवाने प्राणहानी ठळली

गोंधळलेल्या महिला चालक ऑटोमेटीक निसान मायक्रा कारगाडी चालवित होती. गाडीच्या ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबल्याने गाडीचा वेग वाढला व सरळ कारगाडी रस्ता ओलांडून पार्क करून ठेवलेल्या गाडीला जोरदार ठोकर दिली. ढवळी येथे नेहमी नागरिकांच्या या कट्टय़ावर गप्पा रंगत होत्या. नेमकी यावेळी जास्त वर्दळ नव्हती, केवळ दैव बलवत्तर म्हणून आपण वाचलो अशी प्रतिक्रीया यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली.