|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जीकल स्ट्राईक ? : गृहमंत्र्यांची संकेत

भारतीय सैन्याकडून पुन्हा सर्जीकल स्ट्राईक ? : गृहमंत्र्यांची संकेत 

ऑनलाईन टीम / लखनौ :

उत्त्सीमेवर दोन-तीन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याकडून सर्जिकल स्ट्राइकसारखी मोठी कारवाई केल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. आपल्या जवानांनी सीमेवर सर्जिकल स्ट्राइक सारखे असे काही केलं आहे ज्याची माहिती तुम्हाला लवकरच कळेल, असे त्यांनी सुचकपणे म्हटले आहे.

शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे संकेत दिले. त्याचबरोबर आपल्या सैन्यासोबत क्रूरता सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.राजनाथ म्हणाले, पाकिस्तानकडून नुकतेच आपल्या जवानांसोबत काही चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या जवानांनी सीमेवर काही केलं आहे, काही लोकांना याची माहिती आहे. पुढील काही दिवसांत आपल्यालाही याची माहिती कळेल. भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतरही पाकिस्तान आपल्या नापाक कारवाया थांबवत नाहीए. त्यामुळे मी आपल्या बीएसएफच्या जवानांना सांगितले आहे की, शेजारचा देश आहे त्यामुळे पहिल्यांदा गोळी चालवू नका. जर तिकडून गोळी आली तर मात्र, आपल्या गोळय़ा मोजत बसू नका.