|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » फेसबुकवर हॅकर्सचा हल्ला ;पाच कोटी खाती हॅक

फेसबुकवर हॅकर्सचा हल्ला ;पाच कोटी खाती हॅक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

फेसबुकची तब्बल 5 कोटी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहेत. हॅक झालेल्या अकाऊंटमध्ये भारतीय अकाऊंटचा मोठय़ा प्रमाणावर समावेश असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. फेसबुकच्या view as या सुविधेच्या सुरक्षेतील उणीवांचा गैरफायदा घेत हॅकर्सने फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती खुद्द कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी दिली.

सुरक्षेच्या कारणास्तव फेसबुककडून केल्या गेलेल्या उपाययोजनेअंतर्गत आणखी चार कोटी फेसबुक अकाऊंट प्रभावित झाल्याचंही झुकेरबर्ग यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. हॅक झालेली पाच कोटी खाती नेमकी कोणत्या देशातील असल्याचं मात्र फेसबुककडून जाहीर करण्यात आलेलं नाही. जगभरात फेसबुकचे 2 अब्जाहून अधिक युजर्स आहेत. यात सर्वाधिक 27 कोटी युजर्स हे भारतात आहेत. त्यामुळे हॅक करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये भारतीय अकाऊंटचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं बोललं जात आहे.