|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

तुला राशीत बुध प्रवेश, चंद, मंगळ प्रतियुती होत आहे. तुमच्या धंद्यात अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येईल. नवीन व्यक्ती तुम्हाला धंदा देण्याची शक्मयता आहे. नोकरीत दादागिरी करू नका. राजकीय- सामाजिक कार्यात ताण-तणाव होऊ शकतो. प्रति÷sचा प्रश्न करत राहू नका. तडजोडीनेच तुमची मते त्यांना पटवून  द्या. घरातील समस्या कमी होतील. कोर्टकेसमध्ये नम्रतेने बोला. कला-क्रीडा स्पर्धेत टिकणे कठीण आहे. कौतुक होईल. परीक्षेसाठी मेहनत घ्या.


वृषभ

तुला राशीत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. राजकीय- सामाजिक क्षेत्रात नेते सहकारी तुम्हाला मदत करण्यात कुचराई करतील. वरि÷ांचा पाठिंबा राहील. धंद्यात फसगत होऊ शकते. गोड बोलणाऱया व्यक्तीपासून  सावध रहा. संसारात  दुटप्पी धोरण ठेवल्यास वाद होऊ शकतो. कला- क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी मिळू शकेल. कोर्टकेसमध्ये नाटकीपणावर टिका होईल. परीक्षेसाठी अभ्यास करा व पोटाची काळजी घ्या.


मिथुन

सप्ताहाच्या सुरुवातीला वादविवाद होईल. रागावर नियंत्रण ठेवा. तुमचे सर्व व्यवस्थित चाललेले पाहून काही लोक मुद्दाम वाद करतील. तुळेत बुधाचा प्रवेश होत आहे. सूर्य, चंद्र त्रिकोण योगामुळे राजकीय-सामाजिक कार्यात प्रसिद्धी मिळेल. लोकांचे सहाय्य मिळेल. योजना पूर्ण करा. धंद्यात फायदा होईल. वाढ होईल. नवीन ओळखीचा फायदा होईल. मुले, जीवनसाथी यांची प्रगती होईल. स्पर्धेत पुरस्कार व पैसा मिळेल. परीक्षेत यश मिळेल.


कर्क

सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, तुळेत बुध प्रवेश होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर घरात किरकोळ वाद होईल. वाटाघाटी संबंधी विषय निघेल. प्रवासात सावध रहा. राजकीय-सामाजिक कार्यात प्रभाव वाढतच जाईल. जनहिताचा विचार करून कार्यक्षेत्र ठरवा. धंद्यात खर्च होईल. काम मिळेल. शेअर्सचा अंदाज बरोबर येईल. नोकरीत टिकून रहा. स्पर्धेत जिंकाल. परीक्षेसाठी तयारी करा. मौजमजेत वेळ फुकट जाऊ शकतो.


सिंह

सूर्य, चंद्र लाभयोग व तुळेत बुध प्रवेश करीत आहे. तुमच्या धंद्यात नवा फंडा शोधता येईल. जम बसेल. थकबाकी मिळवा. मोठे कंत्राट घेऊन ठेवा. जमिनीचे काम करून घ्या. संसारात सुखद वातावरण राहील. विवाह जमेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे कर्तृत्व दिसेल. लोकांचे आकर्षण तुमच्याकडे राहील. कला, क्रीडा क्षेत्रात नामांकन होईल. लाभ मिळेल. नवीन दर्जेदार लोक सहवासात येतील. शिक्षणात प्रगती होईल.


कन्या

तुळेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. थोरा-मोठय़ांच्या मदतीने फायदा होईल. नवे काम मिळेल. नोकरीत बदल करता येईल. घरात शुभकार्य ठरेल. मनावरील दडपण कमी झाल्याने विचारांना चालना मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे मुद्दे प्रभावी असले पाहिजेत, याकडे लक्ष द्या. लोकांना तुम्ही हवे आहात. कला क्रीडा क्षेत्रात चमकाल घर घेता येईल.


तूळ

तुमच्याच राशीत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. वाद वाढेल. तुमच्या विरोधात काही लोक जातील. रागावर ताबा ठेवा. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. संसारात चांगल्या घटना घडतील. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. वाहन जपून चालवा. कला, क्रीडा क्षेत्रात कष्ट घ्या. पुढे संधी मिळेल. वडील माणसांच्या बरोबर नम्रतेने वागा. लबाडी करू नका.


वृश्चिक

तुळेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. गुर्मित राहिल्यास लोकप्रियता कमी होऊ शकते. धंद्यात खर्च वाढेल. अंदाज घेतांना घाई नको. अनाठायी पैसा खर्च  होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात लक्ष द्या. प्रति÷ा टिकवता येईल. मंगळवार, बुधवारी तणाव होईल. घरात नाराजी होईल. कला, क्रीडा क्षेत्रात टिकून राहता येईल. पोटाची काळजी घ्या.


धनु

साडेसातीचे मधले पर्व सुरू आहे. बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. तणावाचे प्रसंग सारखे निर्माण होतील. राजकीय- सामाजिक  कार्यात हयगय करू नका. वाद करण्यापेक्षा कार्य करा. प्रति÷ा मिळेल. लोकांचे प्रेम मिळेल. धंद्यात कष्ट घ्या. वाहन जपून चालवा. काडय़ा घालणारे लोक आजूबाजूला असतील. कोर्टकेसमध्ये यश जवळच दिसेल. परीक्षेची तयारी जय्यत करा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.


मकर

मकर राशीला साडेसातीचे पहिले पर्व सुरू आहे. तुळेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. राजकीय- सामाजिक कार्यात उत्साहवर्धक घटना घडेल. आत्मविश्वासाने  निर्णय घ्याल. कार्य पुढे जाईल. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ अडचणी येतील. धंद्यात जम बसेल. मोठे काम मिळेल. संसारात आनंदी राहाल. कोर्टकेसमध्ये तुमचे मुद्दे प्रभावी ठरतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेसाठी चांगली तयारी होईल.


कुंभ

तुळेत बुध प्रवेश, चंद्र, मंगळ प्रतियुती होत आहे. या सप्ताहात संमिश्र स्वरुपाच्या घटना सर्व ठिकाणी घडतील. राजकीय, सामाजिक कार्यात अडथळे येतील. वाद होतील. रागावर नियंत्रण ठेवा. मनाविरुद्ध घटना घडेल. धंद्यात संधी समोर दिसेल. प्रयत्न करा. घरात शुभ समाचार मिळेल. त्याबरोबर एखादी समस्या तुम्हाला सोडवावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप  राहील. स्वभावात चिडचिडेपणा येईल कुठेही अतिरेक नको.


मीन

धंद्यात मोठे काम तुमच्याकडे येईल. थकबाकी मिळवा. तुळेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र लाभयोग होत आहे. तुमचे मनोबल खंबीर राहील. संसारात जवळची व्यक्ती नाराज होण्याची शक्मयता आहे. राजकीय, सामाजिक कार्यात नेटाने कार्य करा. मैत्रीत वाद, गैरसमज होईल. कला क्षेत्रात वाहवत जाऊ नका. क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. परीक्षेसाठी अभ्यास करा. यश मिळेल.

Related posts: