|Thursday, February 27, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » मोदींचा निर्णय धाडसी होता : सुहाग

मोदींचा निर्णय धाडसी होता : सुहाग 

सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण : कारवाई होती आव्हानात्मक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर माजी सैन्यप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कारवाईचा निर्णय धाडसी होता असे उद्गार काढले आहेत. 23 सप्टेंबर 2016 रोजी मोदींना भेटलो होतो, या भेटीत कारवाईच्या काही योजना पंतप्रधानांसमोर मांडल्या होत्या. सल्लामसलतीनंतर मोदींनी सर्जिकल स्ट्राइकला मंजुरी दिली होती असे सुहाग यांनी म्हटले आहे.

आम्ही आमची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली असून यावर देशाला अभिमान आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून देखील कारवाई करू शकतो हा संदेश आम्हाला पाकिस्तानला द्यायचा होता. परंतु ही मोहीम अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक होती असे सुहाग म्हणाले.

पाकिस्तानला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे आणि भारतात पाठविणे बंद करणे भाग पाडावे, अशा कारवाईवर आमचा विश्वास आहे. सीमेवर आम्ही अशाप्रकारची कारवाई सुरूच ठेवू असे उद्गार माजी सैन्यप्रमुखांनी काढले आहेत.

29 सप्टेंबर 2016 रोजी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. या कारवाईला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकार ‘पराक्रम पर्व’ साजरा करत आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी इंडिया गेट येथे ‘पराक्रम पर्वा’चा शुभारंभ केला होता. भाजपने शनिवारी ट्विट करत एक चित्रफित प्रसारित केली आहे.

सीमेवरील कारवाई सुरूच राहणार

C

चेन्नई : सर्जिकल स्ट्राइकला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिला आहे. सर्जिकल स्ट्राइकद्वारे भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानने यातून धडा शिकला असो किंवा नाही, सीमेवर आमची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नई येथे बोलताना स्पष्ट केले. एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेवर दीर्घकाळापासून बोलणी सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. रशियाकडून शस्त्र खरेदी करणे सुरूच राहणार असल्याचे सीतारामन यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले आहे. राफेल वादाबद्दल संसदेत 4 वेळा उत्तर दिले आह. यात लेखी उत्तराचा देखील समावेश आहे. व्यवहाराबद्दल देण्यात आलेली माहिती खरी असून ती स्वीकारली जातेय की नाही हा खरा प्रश्न असल्याचे म्हणत सीतारामन यांनी विरोधकांना लक्ष्य केले.

Related posts: