|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दाबोळी विमानतळावर 22 लाखांचे विदेशी चलन जप्त

दाबोळी विमानतळावर 22 लाखांचे विदेशी चलन जप्त 

 

प्रतिनिधी/ वास्को

दाबोळी विमानतळावर 22 लाख 30 हजार रूपये किमतीचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी रविवारी रात्री ही कारवाई केली. या प्रकरणी चौघा विदेशी प्रवाशांना ताब्यात घेतले आहे.

  यासंबंधी गोवा कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार विमानतळावरील कस्टमच्या अधिकाऱयांनी आपली नियमित डय़ुटी बजावताना संशयास्पदरित्या वावरताना आढळून आलेल्या चौघा विदेशी प्रवाशांवर पाळत ठेवली असता विदेशी चलनाची तस्करी उघडकीस आली. हे चौघे विदेशी प्रवासी एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहला प्रयाण करण्याच्या तयारीत होते. संशयामुळे कस्टमच्या अधिकाऱयांनी त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ केला. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे अधिकाऱयांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली असता त्यांच्याकडे 22 लाख 30 हजार व 610 रूपये किमतीचे विदेशी चलन आढळून आले. सदर हवाई प्रवाशांनी आपण विदेशी चलनाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होतो अशी कबुली अधिकाऱयांकडे दिली आहे. हवाई प्रवासा दरम्यान ऐवढी मोठी रक्कम बाळगणे कायदय़ानुसार गुन्हा असल्याने कस्टमच्या अयाधिकाऱयांनी हे विदेशी चलन जप्त करून चौघाही प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गोवा कस्टमचे अतिरीक्त आयुक्त टी.आर. गजलक्ष्मी यांच्यामार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास गोव्याचे कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कस्टम आयुक्त व इतर अधिकारी करीत आहेत.

Related posts: