|Friday, August 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्यात कवी शैलेंद्र यांच्या गीतांची मैफल

पुण्यात कवी शैलेंद्र यांच्या गीतांची मैफल 

पुणे / प्रतिनिधी :

शिवांश एंटरटेनमेंटस्तर्फे पुण्यात कवी शैलेंद्र यांनी लिलिलेल्या अजरामर हिंदी गाण्यांचा ‘तेरा चेहरा’ कार्यक्रम सादर होणार आहे. मैफलीत गायक विशाल कालाणी यांच्या आवाजातील काही नवनिर्मित गाणीही सादर होणार आहेत. 8 ऑक्टोबर रोजी एस.एम.जोशी सभागृहात सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सादर होणार असल्याची माहिती गायन मार्गदर्शक पं. ऋषिकेश महाले यांनी पुण्यात †िदली.

मैफलीत गायक विशाल कालाणी यांच्यासोबत विशाखा सावंत-शिंदे, पूर्वा महाले, जानकी देशपांडे, अवनी महाले, अनघ देशपांडे, शर्वरी पत्की-देशापांडे या सहगायकांचाही सहभाग असणार आहेत. मिहिर भडकमकर, विनोद सानावणे यांच्यासह वादक कलाकार, तर निवेदन मनिष गोखले यांचे असणार आहे.