|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » नेक्ससचा आशियामध्ये विस्तार, महसुलात 50 टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा

नेक्ससचा आशियामध्ये विस्तार, महसुलात 50 टक्क्यांच्या वाढीची अपेक्षा 

पुणे / प्रतिनिधी :

आपल्या जागतिक विस्तार आणि आशियामध्ये पाया मजबूत करण्याच्या मोहिमेमध्ये स्वीडिश मालकीच्या आयडेंटिटी आणि सिक्युरिटी सोल्यूशन्स कंपनी नेक्सस ग्रुपने पुणे येथे आपल्या एका मोठ्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. स्वीडन आणि भारतातील वरिष्ठ आघाडीच्या टीमशिवाय नेक्सस बोर्डचे अध्यक्ष मायकेल ओलसन आणि भारतातील स्वीडनच्या कॉन्सुलेट जनरलच्या दूत उल्रिका संडबर्ग उपस्थित होते.

’नेक्सस ग्रुप आशियामध्ये आपला विस्तार वाढवत आहे. मागील वर्षी या कंपनीच्या प्रदेशातील महसूलामध्ये 50 टक्के वाढ झाली आणि हा ट्रेंड पुढे चालेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे भारतात आणखी लोकांना नेमून नवीन कार्यालयाचे उद्घाटन करून आम्ही या प्रदेशात जास्त गुंतवणूक करत आहोत’, असे मतनेक्ससचे मुख्य कार्यकारी अधिकारी लार्सन पीटरसनयांनी व्यक्त केले.

आमच्या स्मार्ट आयडी प्लॅटफॉर्मची मागणी या बाजारपेठांमध्ये वाढत आहे, परंतु आशियातील उगवत्या अर्थव्यवस्थांचा वाढीचा दर विकसित जगांच्या तुलनेपेक्षा खूप जास्त आहे आणि आयडेंटिटी सोल्यूशन्सच्या मागणीत हे प्रतिबिंबित होत आहे, असेपीटरसन म्हणाले.

Related posts: