|Monday, August 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » राजस्थान पोलिसांच्या ‘केबीसी’चे होतेय कौतुक

राजस्थान पोलिसांच्या ‘केबीसी’चे होतेय कौतुक 

जयपूर

 राजस्थान पोलिसांनी सर्वसामान्यांना गुन्हे आणि त्याच्याशी निगडित कायद्यांबद्दल जागरुक करण्यासाठी ‘कौन बनेगा करोडपती’च्या धर्तीवर ‘कितना बडा क्राईम’ कार्यक्रम तयार केला आहे. समाजमाध्यमांवर या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. पोलिसांनी राबविलेल्या या प्रश्नोत्तराच्या प्रारुपातील कार्यक्रमाला फेसबुक तसेच ट्विटर यासारख्या समाजमाध्यमांवरून प्रसारित केले जात आहे. लोकांना विविध गुन्हे आणि त्याच्याशी निगडित कायद्यांबद्दल माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 24 सप्टेंबर रोजी या उपक्रमास प्रारंभ झाला असून लोकांचा देखील याला चांगला प्रतिसाद मिळतोय. नियम-कायद्यांबद्दल जाणून घेण्यास इच्छुक तसेच ‘क्विज गेम’ खेळण्यास इच्छुक असणारे लोक हा कार्यक्रम पाहत असल्याची माहिती पोलीस महासंचालक ओ.पी. गल्होत्रा यांनी दिली. कितना बडा क्राईममध्ये विविध गुन्हे आणि त्यांच्याशी निगडित कायद्यांबद्दल प्रश्न विचारले जातात, ज्यात लैंगिक शोषणाशी संबंधित प्रकरणे देखील सामील आहेत.