|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात : राहुल गांधी

मोदी उद्योगपतींची चौकीदारी करतात : राहुल गांधी 

ऑनलाईन टीम / वर्धा  :

अनुभव नसताना अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेल विमानाचा करार का देण्यात आला? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे. वर्ध्यातील सेवाग्राममधील सभेत बोलताना राफेल करारावरुन राहुल गांधींनी नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. अनिल अंबानी यांनी संपूर्ण आयुष्यात एकही विमान बनवलेले नाही. एचएएल इतकी वर्ष विमान निर्मिती करत आहे,पण त्यांच्याकडून काढून घेत अनिल अंबानींना करार देण्यात आला. 30 हजार कोटी त्यांच्या खिशात घालण्यात आले.मोदी उद्योगपतींची चौकीदारी करत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 

यावेळी बोलताना त्यांनी लोकांना तुम्ही नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आणून पाहिलेत. मात्र आता त्यांची गाडी पंक्चर झाली आहे अशा शब्दांत टीका केली. अनिल अंबानी यांच्यावर 33 हजार कोटींचे कर्ज आहे .10 दिवस आधी अनिल अंबानी यांनी कंपनी उभी केली होती. 10 दिवसांनी त्यांना करार मिळाला. नरेंद्र मोदी फ्रान्सला गेले तेव्हा अनिल अंबानीदेखील त्यांच्यासोबत होते. मनोहर पर्रीकर मला काही माहिती नाही सांगतात. करार कसा बददला हे मला माहित नाही असे पर्रीकरांचे शब्द आहेत. नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांना करार का दिला हे जाहीर करावे अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

 

Related posts: