|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अफगाणिस्तान : प्रचारसभेत स्फोट, 13 ठार

अफगाणिस्तान : प्रचारसभेत स्फोट, 13 ठार 

वृत्तसंस्था/ जलालाबाद 

अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात एका संसदीय उमेदवाराच्या प्रचारसभेदरम्यान मंगळवारी दुपारी एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात 13 जण मारले गेले असून 40 जण जखमी झाले आहेत. मागील शुक्रवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकृतपणे मोहीम राबविण्यात आली होती, त्याच्या तयारीपूर्वी मोठा हिंसाचार झाला होता, या हिंसाचारानंतर झालेला हा पहिला आत्मघाती हल्ला आहे.

नांगरहारच्या पूर्व प्रांतातील काम जिल्हय़ात उमेदवार अब्दुल नासीर मोहम्मद यांच्या समर्थकांच्या मधोमध जात दहशतवाद्याने स्वतःला स्फोटाद्वारे उडविले. या हल्ल्यातून नासीर हे बचावले असले तरीही ते जखमी झाल्याची माहिती प्रांतीय गव्हर्नरांचे प्रवक्ते अताउल्ला खोग्यानी यांनी दिली.

मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, जखमींपैकी काहीची प्रकृती गंभीर असल्याचे सार्वजनि आरोग्य संचालक नजीबुल्ला कामावाल यांनी सांगितले. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. मागील काही महिन्यांमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती.

हिंसाचारामुळे अफगाणिस्तानातील मतदान प्रक्रिया प्रभावित झाली आहे. 20 ऑक्टोबर रोजी येथे मतदान होणार आहे. स्वतंत्र निवडणूक आयोगानुसार आतापर्यंत 5 उमेदवारांची हत्या करण्यात आली असून देशातील हिंसाचार आणखीन वाढत जाण्याची भीती व्यक्त होतेय. आतापर्यंत मतदार नोंदणी केंद्रांवर अनेक हल्ले झाले असून यात काबूल येथील एका केंद्रांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा समावेश होता, यात 100 हून अधिक जण मारले गेले होते. यंदा अफगाणिस्तानात झालेल्या हल्ल्यांमध्ये 20 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होतेय. 2001 पासून सुरू झालेल्या हिंसाचारानंतर हे सर्वाधिक प्रमाण आहे.

Related posts: