|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » लॅण्डींग करताना मुंबई-औरंगाबाद विमानाला धडकला पक्षी

लॅण्डींग करताना मुंबई-औरंगाबाद विमानाला धडकला पक्षी 

 ऑनलाईन टीम/  औरंगाबाद :

औरंगाबादला येणाऱया जेट एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावरून सकाळी उड्डाण केले. तासाभरानंतर हे विमान चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. याठिकाणी पोहोचल्यानंतर एक पक्षी विमानाला येऊन धडकल्याचे समोर आले. या घटनेत प्रसंगावधन राखत वैमानिकाने विमान सुखरूप विमानतळावर उतरविले.

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱया जेट एअरवेजच्या विमानाला दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा पक्षाने धडक दिल्याची घटना आज सकाळी घटली. यामुळे औरंगाबादहुन मुंबईला जाणाऱया विमानाचे उड्डाण थांबविण्यात आले. परिणामी विमानतळावर शेकडो प्रवासी खोळंबळे होते.

हेच विमान पुन्हा मुंबईसाठी उड्डाण करते. मुंबईला जाण्यासाठी सकाळी शंभरपेक्षा अधिक प्रवासी विमानतळावर आले होते. मात्र, पक्षाची धडक बसलेली असल्याने विमानाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विमानाचे उड्डाण दुपारी 12 वाजता होईल, असे जेट एअरवेजचकडून प्रवाशांना सांगण्याचे आले. त्यामुळे काही प्रवाशांनी प्रवास रद्द केला, तर काहींनी सायंकाळच्या विमानाने जण्याचा निर्णय घेतला. काही जण वाहनाने मुंबईला रवाना झाले. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले म्हणाले, विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी अडकल्याची माहिती मिळाली. परिणामी मुंबईला जाणाऱया विमानाचे उड्डाण थांबले आहे.

दोन महिन्यांपूर्वीही घटना

दोन महिन्यांपूर्वी 29 जुलै रोजीदेखील जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याने (बर्ड हिटिंग) त्याचे उड्डाण रद्द करावे लागले. त्याच्या इंजिनचे खराब झालेले भाग मुंबईहून मागविण्यात आले होते. आता पुन्हा एकदा आज अशीच घटना घडली. याला जेट एअरवेजच्या अधिकाऱयांनी दुजोरा दिला

कचऱयाने वाढले पक्षी

विमानतळ परिसरात वाढलेल्या कचऱयामुळे य परिसरात पक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्याचा विमानाच्या सुरक्षित वाहतुकीवर विपरित परिणाम होत असल्याचे दिसते. त्यामुळे विमानाजवळून पक्षी उडण्याच्या घटना घडत आहेत.

Related posts: