|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फॉर्मेलिन चाचणी किट चार शहरांमध्ये उपलब्ध करणार

फॉर्मेलिन चाचणी किट चार शहरांमध्ये उपलब्ध करणार 

दुसऱया टप्प्यात उर्वरीत शहरांतही देणार किट

प्रतिनिधी/ पणजी

पणजी, मडगाव, फोंडा व वास्को येथील मासळी बाजारानजिक असलेल्या औषधालयात फॉर्मेलिन चाचणी किट उपलब्ध असेल, अशी माहिती सरकारी वकील प्रविण फळदेसाई यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली आहे.

फॉर्मेलिन चाचणी किट गोव्यातील इतर ग्राहकांना उपलब्ध करण्याचा आदेश यापुर्वी खंडपीठाने दिला होता. पहिल्या टप्प्यात ही चार शहरे व दुसऱया टप्प्यात म्हापसा, सांखळी, सांगे, कुडचडे अशा इतर शहरांतही सदर किट उपलब्ध केले जातील, असे त्यांनी सांगितले.

फोंडय़ात आतापर्यंत 19 किटची खरेदी

हे चाचणी किट पुरवठा करण्याची जी एजन्सी आहे त्या एजन्सीनेच सदर किट मासळी बाजाराच्या नजिक असलेल्या औषधालयात उपलब्ध करण्याची जबाबदारी घेतल्याचे त्यांनी कळविले. फोंडा येथील औषधालयातून आतापर्यंत 19 जणांनी सदर कीट नेले आहे त्यात पंचतारांकित हॉटेलांचाही समावेश आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनेही कीट विकत घेण्यात आले, पण सदर पक्षाच्या वतीने वगळता इतर कोणाच्या तक्रारी नसल्याचे ते म्हणाले.

एडीएने घेतल्या दोन हजार चाचण्या

गोवा अन्न आणि औषध प्रशासनालयाने सुमारे 2000 चाचण्या घेतल्या, पण त्यात एकही फॉर्मेलिनचे प्रकरण आढळले नाही. काही नमूने प्रशासनालयाच्या अधिकाऱयांनी आणले होते. काहीवेळा सामान्य ग्राहकाला पाठवून मासळी आणण्यात आली, पण फॉर्मेलिन आढळले नाही असे त्यांनी सांगितले. प्रयोगशाळेत इतर पद्धतीने चाचणी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

चाचणीची पद्धत योग्य आहे की नाही हे केंद्रीय प्रयोग शाळेने स्पष्ट करायला हवे, पण नोटीस पाठवूनही त्यांनी उत्तर दिले नसल्याचे याचिकादाराच्या वकिलांनी खंडपीठाच्या नजरेस आणून दिले. त्यावेळी सदर एफआयएसएसआय या केंद्रीय संस्थेच्या वकिलांनी उत्तर सादर करण्यास वेळ मागितला.

Related posts: