|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » पर्दापणात पृथ्वी शॉचे शानदार अर्धशतक

पर्दापणात पृथ्वी शॉचे शानदार अर्धशतक 

ऑनलाईन टीम / राजकोट :

मुंबईच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत आपल्या लौकिकाला साजेसे पदार्पण केलं आहे. त्याने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 130 धवांची भागीदारी रचली. त्यामुळे टीम इंडियाला पहिल्या दिवशी उपाहाराला एक बाद 133 धवांची मजल मारता आली. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी पृथ्वी 75 धवांवर खेळत होता. त्याच्या या खेळीला अकरा चौकारांचा साज आहे. कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो आजवरचा सर्वात युवा भारतीय फलंदाज ठरला. तर पुजाराने 74 चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद 56 धवांची खेळी केली आहे.

 

दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या राजकोट कसोटीत टीम इंडियाचा कर्णधर विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटीत संपूर्ण भारताचे लक्ष 18 वषीय पृथ्वी शॉच्या पदार्पणाकडे लागले होते. पृथ्वी शॉ आणि के एल राहुल भारताकडून सलामीला उतरले. महत्त्वाचं म्हणजे विराट कोहलीने तीन फिरकीपटू आणि दोन मध्यमगती गोलंदाजांना संघात स्थान दिले आहे. यामध्ये रवोंद्र जाडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव या फिरकीपटूंचा तर उमेश यादव आणि मोहम्मद शमी या मध्यमगती गोलंदाजांचा समावेश आहे. तिसरा फिरकीपटूच खेळवल्याने शार्दूल ठाकूरला बाहेर बसावे लागले. अंतिम 11 जणांमध्ये 5 फलंदाज, 5 गोलंदाज आणि 1 विकेटकीपर ऋषभ पंत यांचा समावेश आहे.