|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » कर्जाचा हप्ता वाढणार नाही ; आरबीआयचा दिलासा

कर्जाचा हप्ता वाढणार नाही ; आरबीआयचा दिलासा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समिती(एमपीसी)ने शुक्रवारी 2018-19च्या चौथ्या द्वि-मासिक धोरणाचा फेरआढावा घेत रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही. रेपो रेट जैसे थेच ठेवल्याने रिझर्व्ह बँकेने साऱयानांच सुखद धक्का दिला आहे. रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही.

 

रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के आहे. तर महागाई दर हा चार टक्केच राहिला आहे. महागाई दर अपेक्षेप्रमाणे स्थिर राहिल्याने रिझर्व्ह बँकेचा विश्वास वाढला आहे. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील वृद्धीदर 7.4 टक्के राहण्याची शक्मयता वर्तवली आहे, तसेच हा वृद्धीदर 2019-20 वर्षांत 7.6 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

 

आरबीआयने रेपो रेट न वाढवल्यामुळे कर्जदारांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे. गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जाचा हप्ता आता जैसे थेच राहणार आहे. रेपो दरात बदल न करताना कठोर आर्थिक निर्णय भविष्यात घेतले जातील, अशी भूमिका बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी मांडली. याचा अर्थ येत्या काळात दर वाढतील किंवा तेवढेच राहतील, पण कमी होण्याची शक्मयता नाही. महागाई दर कुठल्याही स्थितीत 4 टक्क्यांच्या वर जाणार नाही, यासाठी कटिबद्ध असल्याची पटेल यांची ग्वाही दिली.

 

 

 

 

Related posts: