|Friday, August 23, 2019
You are here: Home » Top News » दहावी बारावी  परीक्षेच्या तारखा  जाहीर

दहावी बारावी  परीक्षेच्या तारखा  जाहीर 

 पुणे / प्रतिनिधी :

 फेबुवारी-मार्च 2019 मध्ये होणारी बारावीची लेखी परीक्षा 21 फेबुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 1 ते 22 मार्च  या कालावधीत होणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनही मंडळाकडून करण्यात आले आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, महाविद्यालय यांना कळविण्यात येईल, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.