|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा किंचित वाढ

पेट्रोल, डिझेल दरात पुन्हा किंचित वाढ 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र आणि राज्य सरकारने इंधनाच्या दरात कपात केल्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळाला असतानाच पुन्हा दरवाढीला सुरुवात झाली आहे. करकपात झाल्यानंतर एक-दोन दिवसातच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरू झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 14 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 31 पैशांनी वाढले आहेत. देशात अन्यत्रही या दरांमध्ये किंचित वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आता पेट्रोल दर प्रतिलिटर 87.29 रुपये, तर डिझेल 77.06 रुपये प्रतिलिटर झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पाच रुपयांची घट होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

कोट करणे

मागील काही दिवसांमध्ये नक्षलग्रस्त जिल्हय़ांत घट झाली आहे. देश लवकरच नक्षलवादातून मुक्त होईल. यासाठी ‘सीआरपीएफ’ आणि स्थानिक पोलिसांचे धैर्य, निश्चिय, कठोर परिश्रम कारणीभूत असेल.