|Friday, August 23, 2019
You are here: Home » क्रिडा » लक्ष्य सेन, वैष्णवी रेड्डीकडे ज्युनियर भारतीय संघाचे नेतृत्व

लक्ष्य सेन, वैष्णवी रेड्डीकडे ज्युनियर भारतीय संघाचे नेतृत्व 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विद्यमान ज्युनियर आशियाई चॅम्पियन लक्ष्य सेन हा कॅनडातील मारखम येथे 5 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया बीडब्ल्यूएफ विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. मुलींच्या नेतृत्वाची धुरा वैष्णवी रेड्डीकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय पथकात 13 मुले व 11 मुलींचा समावेश असल्याची माहिती बॅडमिंटन महासंघाने दिली.

भारतीय बॅडमिंटन महासंघाने विश्व स्पर्धेसाठी निवडलेल्या संघासाठी अनिवार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर पंचकुला, हरियाणा येथे 16 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होईल. कॅनडात होणाऱया या स्पर्धेसाठी खेळाडूंची अ.भा. रँकिंग निवड स्पर्धेच्या आधारे केली जाते. यात सप्टेंबर महिन्यात चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा व पंचकुला येथे झालेल्या कृष्णा खेतान स्पर्धेचा समावेश होता. निवड समितीने या दोन्ही स्पर्धांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे खेळाडू निवडले आहेत.