|Friday, October 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 48 तासांत राज्यभरात दमदार पाऊस

48 तासांत राज्यभरात दमदार पाऊस 

प्रतिनिधी/ बेंगळूर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट निर्माण झाल्यामुळे पुढील 48 तासांत राज्यभरात मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज राज्य हवामान खात्याने वर्तविला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चप्रीवादळ होणार आहे. याचा परिणाम दक्षिण भारतातील राज्यांमध्ये दमदार पाऊस होणार आहे. अरबी समुद्रातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार झाला असून राज्यातील किनारपट्टीवरील जिल्हे असलेल्या कारवार, मंगळूर, आणि उडुपी जिल्हय़ांमध्येही पाऊस होणार आहे. बेंगळूरसह इतरत्र देखील पावसाचा जोरदार मारा होणार असल्याचे हवामान खात्यातील अधिकाऱयांनी सांगितले आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, अशी सतर्कतेची सूचना हवामान विभागाने मच्छिमारांना दिली आहे.

कोडगू जिल्हय़ांत आणखी दोन दिवस पाऊस शक्य

कोडगू जिल्हय़ात काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. आणखी दोन दिवस या जिल्ह्य़ात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे पूरस्थिती गृहीत धरून जिल्हाधिकाऱयांनी आपत्ती निवारण विभागाला कार्यप्रवृत्त राहण्याची सूचना दिली आहे.