|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » इंधन दरवाढ सुरूच , मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले

इंधन दरवाढ सुरूच , मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31पैशांनी महागले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत मंगळवारी (9 ऑक्टोबर) पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 31 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.73 तर डिझेलचा प्रति लिटर दर 77.68 झाला आहे.

राजधनी दिल्लीत पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.26 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 74.11 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळय़ांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली होती. मात्र त्यानंतरही इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे.