|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » संस्कारी अभिनेते अलोकनाथांवर बलात्काराचा आरोप

संस्कारी अभिनेते अलोकनाथांवर बलात्काराचा आरोप 

ऑनलाईन टीम / मुंबई :

 #me tooया चळवळीअंतर्गत देशभरातील विविध क्षेत्रातल्या महिलांनी आपल्यावर झालेले लैंगिक अत्याचार, गैरवर्तन यांच्याविषयी आवाज उठवायला सुरुवात केली आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ता, पूजा भट्ट, कंगना रनौत यांनी नुकतीच आपली आपबिती मीडियासमोर सांगितली. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यापासून दिग्दर्शक विकास बहल, लेखक चेतन भगत, अभिनेता रजत कपूर अशा अनेक जणांवर आरोप झाले आहेत. त्यातच ’संस्कारी बाबूजी’ अशी ओळख असलेले ज्ये÷ अभिनेते अलोकनाथही या जंजाळात अडकण्याची शक्मयता आहे. प्रख्यात सिरीअल लेखिका विनिता नंदा यांनी अलोकनाथांवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचे आरोप केले आहेत.

 

80 आणि 90 च्या दशकात टीव्ही इंडस्ट्रीत लेखिका-दिग्दर्शिका-निर्माती म्हणून ओळख मिळवलेल्या विनिता नंदा यांनी अलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. विनिता यांनी लिहिलेली ’तारा’ ही मालिका 1993 मध्ये लोकप्रिय झाली होती. त्याच काळात अलोकनाथ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होते.विनिता नंदा यांनी सोमवारी रात्री फेसबुक पोस्ट लिहून आरोप केले आहेत. पोस्टमध्ये त्यांनी अलोकनाथ यां®³ाा नावाचा उल्लेख केलेला नसला, तरी तसे थेट संकेत त्यांनी दिले आहेत.

 

’त्याची पत्नी माझी बेस्ट प्रेंड होती. आमचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मी तारा नावाची मालिका लिहित होते. तो माझ्या मालिकेतील नायिकेच्या मागे होता. तो दारुडा, निर्लज्ज होता, मात्र त्या दशकातील स्टार होता. माझ्या नायिकेला तो सेटवर त्रास द्यायचा, पण सगळे मूग गिळून गप्प होते. तिने आमच्याकडे तक्रार केली तेव्हा आम्ही त्याला काढून टाकायचा निर्णय घेतला. दोघांमध्ये शेवटचा सीन शूट करुन त्याला नारळ दिला जाणार होता, पण त्याला कुणकुण लागली. त्याच दिवशी तो दारु पिऊन सेटवर आला. शॉटला बोलवेपर्यंत तो पित बसला. कॅमेरा रोल होताच तो नायिकेच्या अंगचटीला आला. तिने त्याला कानफटात लगावली. मी सांगितलं, यापुढे तू आमच्या कोणत्याही मालिकेत दिसणार नाहीस. नंतर मित्रांच्या मध्यस्थीमुळे आम्ही पुन्हा बोलायला लागलो’ असं विनिता नंदा सांगतात.

 

Related posts: