|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » leadingnews » राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

राफेल खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

राफेल विमान करारावरून केंद्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. राफेल कराराप्रकरणी दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी करताना या विमानांच्या खरेदी प्रक्रियेची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 29 ऑक्टोबरला होणार आहे.

राफेल विमानांच्या किमतींवरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्या होत्या. त्या याचिकांवर आज सुनावणी झाली. या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान कराराच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती सीलबंद लिफाफ्यातून आपल्यासमोर सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीताराम या राफेल विमान खरेदीवरून देशात उठलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयामध्ये त्या आपले फ्रान्स सरकारमधील समकक्ष फ्लोरेंस पार्ली यांच्याशी दोन्ही देशांमधील सामरिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत तसेच स्थानिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चा होऊ शकते. दरम्यान, राफेल विमान करारात मोठय़ा प्रमाणात अनियमितता आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. यूपीए सरकारने केवळ 526 कोटी रुपये एवढे एका विमानाचे मूल्य ठरवले असताना, मोदी सरकारने नवा करार करून 1670 कोटी रुपयांना विमानांची खरेदी केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

Related posts: