|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » क्रिडा » पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजी

पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजी 

वृत्तसंस्था/ ईस्ट लंडन

येथे झालेल्या झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 34 धावांनी विजय संपादन केला. या विजयासह द.आफ्रिकेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. प्रारंभी, द.आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 160 धावा जमवल्या. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा डाव 17.2 षटकांत 126 धावांत संपुष्टात आला. उभय संघातील दुसरा सामना दि. 12 रोजी होईल.

प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर डिकॉक (5) व क्लोएट (2) हे आफ्रिकेचे स्टार सलामीवीर झटपट बाद झाले. यानंतर, कर्णधार डु प्लेसिस व डय़ुसेन जोडीने तिसऱया गडय़ासाठी 41 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण, फटकेबाजीच्या प्रयत्नात डु प्लेसिस 34 धावा काढून बाद झाला. डय़ुसेनने मात्र 44 चेंडूत 56 धावांची खेळी साकारताना संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. डेव्हिड मिलरने त्याला 39 धावा करत चांगली साथ दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर फेहलकियो (4) व जोंकर (8) धावा करत आफ्रिकेला 20 षटकांत 6 बाद 160 धावापर्यंत मजल मारुन दिली.

प्रत्युतरातदाखल खेळताना फिरकीपटू इम्रान ताहीरच्या (23 धावांत 5 बळी) भेदक माऱयासमोर झिम्बाब्वेचा डाव 17.2 षटकांत 126 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेतर्फे पीटर मूरने सर्वाधिक 44 धावा केल्या. ब्रेडॉन टेलर (19) व सीन विल्यम्स (21) धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्याने झिम्बाब्वेला 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 160 (डय़ुसेन 56, डु प्लेसिस 34, डेव्हिड मिलर 39, जेर्व्हिस 3/37, मोफु 2/24).

झिम्बाब्वे 17.2 षटकांत सर्वबाद 126 (पीटर मूर 44, सीन विल्यम्स 21, टेलर 19, ताहीर 5/23, डाला 2/25).

Related posts: