|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महिला शहर काँग्रेसतर्फे झिम्मा-फुगडी कार्यक्रम उत्साहात

महिला शहर काँग्रेसतर्फे झिम्मा-फुगडी कार्यक्रम उत्साहात 

कोल्हापूर

महिला शहर काँग्रेसच्यावतीने काँग्रेस कमिटीमध्ये झिम्मा-फुगडी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी केडीसी बँक संचालिका उदयानिदेवी साळुंखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमास महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा संध्याताई घोटणे, नगरसेविका जयश्री चव्हाण, दीपाताई पाटील, चंदाताई बेलेकर, प्रा. सौ. अनुराधा मांडरे, विद्याताई घोरपडे, शुभांगी साखरे, मंगलताई खुडे, वैशाली पाडेकर व सर्व नगरसेविका उपस्थित होत्या.

यावेळी यशस्वीनी ग्रुप कदमवाडी, जादू ग्रुप रविवारपेठ, पंचगंगा ग्रुप यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच वैयक्तीक गटात- उखाणे, फुगडी, सूप नाचविणे, घागर घुमविणे आदी स्पर्धांमध्ये बक्षिसे देण्यात आली.