|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » ओडिशाला ‘तितली’ चक्रीवादळाची धडक, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

ओडिशाला ‘तितली’ चक्रीवादळाची धडक, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धरण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱयावर येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितास या वेगाने पुढे सरकले आहे.

गुरुवारी (11 ऑक्टोबर) हे वादळ ओडिशातील गोपाळपूर आणि आंध्र प्रदेशातील कलिंगापत्तनमच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले. ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी परिस्थितीची माहिती घेतली असून त्यांनी गंजम, पुरी, खुर्दा, केंद्रपाडा आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यातील कलेक्टरांना तटवर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांची घरं तातडीने रिकामी करण्यास सांगितलं आहे. तसेच नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवारागृहे उभारण्यास सांगण्यात आले आहे.