|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » विविधा » म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, मुंबईत घर घेणाऱयांना मोठा दिलासा

म्हाडाच्या घरांच्या किमती होणार कमी, मुंबईत घर घेणाऱयांना मोठा दिलासा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

rम्हाडाच्या घरांच्या किमती लवकरच कमी होणार आहेत. त्यामुळेच दिवाळीपूर्वीच म्हाडा घर खरेदी करणा-या सामान्य माणसांना मोठी गूड न्यूज देणार आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना म्हाडा मोठा दिलासा देण्याची शक्मयता आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार असल्याची माहिती दिली आहे.

म्हाडाच्या घराच्या किमती कमी करण्याचा आमचा प्रस्ताव होता. म्हाडाच्या घर विक्रीसाठी तीन टप्पे ठरवण्यात आले आहेत. जी घरे पडून आहेत. त्यांची वेंमत कमी करून ती पुन्हा विक्रीला काढण्यात येणार आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत आम्ही मुंबईकरांना दिवाळीची भेट देऊ, असेही उदय सामंत म्हणाले आहेत. बिल्डरकडून आलेल्या किमती कमी करून आम्ही सामान्यांना घरे उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर ती घरं नागरिकांसाठी खुली करण्यात येतील, असेही उदय सामंत येंनी स्पष्ट केले आाहे.