|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » 122 वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा तुटवडा

122 वीजनिर्मिती प्रकल्पात कोळशाचा तुटवडा 

नवी दिल्ली :

सण-उत्सवात वीज संकटाना सामोरे जावे लागणार आहे. कारण देशातील 122 वीज निर्मिती प्रकल्पामध्ये कोळशाची मोठय़ा प्रमाणात कमतरता भासत आहे. पावसाळा संपायला आला तरी देखील कोळशाचा पुरवठा होत नसल्याने याबाबतची चिंता कोळसा सचिव इंद्रजित सिंह यांनी कोल इंडियाचे सीएमडी यांना पत्राद्वारे कळविले आहे.

10 विज प्रकल्पात कोळशासाठा शुन्य

कोल इंडियाच्या सीएमडी यांना लिहिलेल्या पत्रात कोळशा सचिव सिंह यांनी म्हटले आहे की, 3 ऑक्टोबर 2018 च्या आकडेवारीनुसार 10 थर्मल वीज प्रकल्पामध्ये कोळशाचा शिल्लक साठा काहीच नाही. तर 46 वीज प्रकल्पामध्ये 1 ते 3 दिवसापर्यंतचा साठा शिल्लक आहे. त्याचबरोबर 20 वीज प्रकल्पाकडे 6 दिवसासाठी आणि 31 वीज प्रकल्पाकडे 7 ते 15 दिवसांसाठी कोळशाचा उपलब्ध होता असे सिंह यांनी सांगितले आहे. 

 

 

 

Related posts: