|Monday, June 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सोयूझ अंतराळयानात बिघाड

सोयूझ अंतराळयानात बिघाड 

मॉस्को / वृत्तसंस्था :

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी उड्डाण केल्यावर सोयूझ अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्याने कझाकिस्तानात त्याचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या अग्निबाणातून 2 अंतराळवीर प्रवास करत होते. ही दुर्घटना गुरुवारी घडली असून इंजिनातील तांत्रिक बिघाड यासाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

अग्निबाणातून प्रवास करणारे अंतराळवीर सुरक्षित असल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. या अग्निबाणातून नासाचे निक हॅगी तसेच रशियन अंतराळ संस्थेचे अलेक्से ओवचिनी हे प्रवास करत होते. अग्निबाण कझाकिस्तानात सुरक्षितपणे उतरविण्यात आले असल्याचे समजते. सोयूज प्रक्षेपण यानाचा सर्वाधिक वापर झाला असून त्याला जगात सर्वात विश्वासार्ह यान मानले जाते. आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक पृथ्वीच्या कनिष्ठ कक्षेत स्थित मानवनिर्मित स्थानक असून तेथे अंतराळवीर वास्तव्य करतात.