|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव जिल्हा संघाची विजयी सलामी

बेळगाव जिल्हा संघाची विजयी सलामी 

बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी :

कर्नाटक राज्य ऑलिंपिक संघटनेच्या वतीने म्हैसूर दसरा क्रिडा स्पर्धेत सुरू असलेल्या वरि÷ांच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या फुटबॉल संघाने शिमोगा जिल्हा संघाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली.

बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या संघाने पहिल्या फेरीत दुबळय़ा शिमोगा जिल्हा संघावर पुर्वार्धात 2-0 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात पुन्हा बेळगाव जिल्हा संघटनेच्या फुटबॉल संघाने आणखीन 3 गोल नोंदविले. बेळगाव संघातर्फे अभिषेक हेरेकर, ज्ञानेश शिंदे, आकाश देसाई, श्रीनंदन व अमिल बेपारी यांनी प्रत्येकी  1 गोल नोंदविला.

गतवर्षी बेंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्य ऑलिंपिक संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कर्नाटक राज्यस्तरिय फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेच्या फुटबॉल संघाने अतुलनिय कामगिरी करताना राज्याचे अजिंक्मयपद पटकावून बेळगावचा दर्जा सिद्ध केला होता. यंदा म्हैसूर दसरा स्पर्धेत पहिलयाच सामन्यात विजयी सलामी देऊन स्पर्धेस दमदार सुरूवात केली आहे.

शिमोगा विरूद्ध विजयी झाल्याबद्दल बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष, नगरसेवक पंढरी परब यांनी बेळगाव संघाचे अभिनंदन केले आहे. बेळगावचा संघ बलवान असून, गत वर्षाच्या विजयाची मालीका कायम ठेवली तर यंदा सुद्धा म्हैसुर दसरा फुटबॉल स्पर्धेत बेळगाव संघ चमकदार कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी पुढील सामन्यासाठी बेळगाव संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.

बेळगाव जिल्हा संघ पुढेल प्रमाणे – कर्णधार किरण चव्हाण, राहुल पंतोजी, कतीम सय्यद, उबादुल्ला बेपारी, विसी मॉटम, अमिल बेपारी, अभिषेक चेरेकर, ओमकार आजरेकर, श्रीहरी पाटील, उमर बेपारी, ज्ञानेश शिंदे, निर्मल सॅबेस्टन, प्रशांत, आकाश देसाई, ज्ञानेश पाटील, इश्वरसिंग बडगुर्जर तर संघ व्यवस्थापक सलिम फणीबंद, प्रशिक्षक प्रा. व्ही. नायक यांची संघात निवड केली आहे.

शुक्रवार दि. 12 रोजी सायंकाळी 4 वा. बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचा फुटबॉल संघाची लढत यजमान म्हैसूर जिल्हा संघाबरोबर होणार आहे.

Related posts: