|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘टिक टॉक’ची तरुणाईमध्ये क्रेझ

‘टिक टॉक’ची तरुणाईमध्ये क्रेझ 

अमर वांगडे/ परळी

पूर्वी मुलं गप्पा मारण्यासाठी कट्टय़ावर किंवा एखाद्या चौकात जायची, परंतु आता गप्पांसाठी उठून कुठे जायची गरज उरली नाही. हातात इंटरनेटशी शस्त्र आले आणि तरुणाईच्या आवाक्यात आकाशच आले. तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना चित्र दिसत आहे. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान सर्वात आघाडीवर आहे. अशा धावपळीच्या व तंत्रज्ञानाचा युगात तरुणाईच्या छुप्या कलागुणांना सोशल मिडियाची साथ देताना दिसत आहे.

इंटरनेट स्वस्त असल्याने तरुणाई त्याचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. दिवसरात्र सोशल मीडियावर सक्रिय राहतात. आता तर ‘टिक-टॉक’ ऍपवर तरुणाईची क्रेझ आहे. सोशल मिडिया जिह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तरुणाईचा मनोरंजनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यातच नानाविविध ऍपद्वारे तरुणाई एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहे.

‘टिक-टॉक’ हे including musical.ly या प्रचलित नेटवर्कचे अधिकृत ऍप आहे. या ऍपद्वारे मजेदार संगीत, व्हिडिओ अगदी सहजरीत्या बनवता येतो. त्यामुळे तरुणाईच्या छुप्या टॅलेंटला वाव मिळालाय. ज्यांना ऍक्टिंग करायची आहे, परंतु त्यांना कुठे संधी मिळत नाही अशांना या ऍपवरून आपले टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. कॉलेज विद्यार्थी नव्हे तर सेलिब्रिटी व वयोवृद्धांना देखील या ऍपचे वेड लागले आहे. कधी हि कुठे ही त्याला वेळ काळ मर्यादा नाही. वेळ भेटला की सध्या तरुणाई ‘टिक-टॉक’ वर मग्न झालेली दिसते . इतकेच नव्हे तर हे व्हिडिओ एवढे व्हायरल होतात की घरबसल्याच प्रसिद्धी मिळत असते. त्यामुळे या ‘टिक-टॉक’ ची क्रेझ निर्माण झाली आहे. ‘टिक-टॉक’वर गाण्यांनी डायलॉग असल्याने त्यावर फक्त प्ले करून आपण फक्त ऍक्टिंग करायची असते.  त्यामुळे ऍक्टिंग करणे सहज सोपे असल्याने तरुणाई दिवस दिवसभर ‘टिक-टॉक’ वर गुंग झाली आहे.

Related posts: