|Monday, June 24, 2019
You are here: Home » leadingnews » मोदींना जीवे मारण्याची धमकी,दिल्ली पोलिसांना इमेल

मोदींना जीवे मारण्याची धमकी,दिल्ली पोलिसांना इमेल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

देशाचे पंतप्रधन नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोदींना धमकी देणारा ईमेल दिल्ली पोलिस आयुक्तांना आाताने पाठवला आहे. गुप्तचर यंत्रणांनी यासंदर्भात     माहिती दिली. नोव्हेंबर 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांना ठार करु, असा उल्लेख इमेलमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

मोदींना धमकी देणारा ईमेल केवळ एका ओळीचा असून, त्यासंदर्भात तपास सुरु करण्यात आला आहे. प्राथमिक तपासानुसार, धमकीचा ईमेल ईशान्य भारतातील राज्यांमधून आल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मात्र, ईमेल नेमका कुणी पाठवला आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीच ठोस माहिती समोर आली नाही.