|Thursday, January 23, 2020
You are here: Home » उद्योग » तेलक्षेत्रात स्वसुरक्षिततेला प्राधान्य हवे : प्रदीप चेल्लपन

तेलक्षेत्रात स्वसुरक्षिततेला प्राधान्य हवे : प्रदीप चेल्लपन 

 

प्रतिनिधी / पुणे :

भूगर्भातून सापडलेल्या कच्च्या तेलावर रासायनिक प्रक्रिया करून त्यातून पेट्रोल, डिझेलसारख्ये इंधन उपलब्ध होते. परंतु भूगर्भात तेल शोधून, प्रक्रिया करणे, तपासणी करून ते जनसामान्यांर्यंत पोहचविणे यात अनेक धोके असतात. इंधनविहिरींवर काम करताना 24 तास तुम्हाला तत्पर रहावे लागते. म्हणून त्याठिकाणी होणाऱया घटना टाळण्यासाठी, स्वसुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधन्य द्यावे,’’ असे प्रतिपादन ओमान ऑइल उद्योगसमूहातील वरि÷ इंधनविहीर भूवैज्ञानिक प्रदीप चेल्लपन यांनी केले.

आंतरराष्ट्रीय भूविज्ञान सप्ताहानिमित्त मराठी विज्ञान परिषद व फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वैज्ञानिक गप्पा कार्यक्रमात ’कहाणी खनिज तेलाची’ या विषयावर चेल्लपन बोलत होते. प्रसंगी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र, कार्यवाह संजय मालती कमलाकर, ज्ये÷ सदस्य डॉ. विद्याधर बोरकर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अनिष सोमण आदी विज्ञानप्रेमी उपस्थित होते.

प्रदीप चेल्लपन म्हणाले की, खडकांमध्ये आढळणाऱया तेलाला खनिज तेल असे म्हणतात. जगामध्ये सौदी अरेबिया व व्हेनेझुएला याठिकाणी सर्वात जास्त खनिज तेल साठा आहे. भूगर्भातील खनिज तेलामध्ये वायू, पाणी व तेल यांचे एकत्रित मिश्रण असल्याने त्यावर प्रक्रिया करूनच ते वापरले जाते. पॉवर सप्लाय, वेल कंट्रोल, सक्मर्युलेटिंग तसेच रोटेटिंग या सिस्टम्सद्वारे काम केले जाते. पूर्वी भूगर्भात खनिज तेल शोधण्यासाठी कित्येक वर्षे खाणकाम सुरु असायचे. परंतु आता तंत्रज्ञानामुळे ते काम अजून सोयीस्कर झाले आहे. आता हेच काम काही महिन्यांमध्येच पूर्ण होते. खनिज तेल भूगर्भातून वर आणण्यासाठी मोठमोठय़ा मशिन्सचा वापर केले जातो.

यावेळी प्रश्नोत्तरांच्या सत्रामध्ये विज्ञान प्रेमींनी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. कार्यक्रमाची प्रस्तावना अनिष सोमण यांनी केली. आभार विनय र. र. यांनी मानले.

Related posts: