|Saturday, February 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » द्रमुकशी नाते तोडल्यास काँग्रेसशी आघाडी शक्य

द्रमुकशी नाते तोडल्यास काँग्रेसशी आघाडी शक्य 

कमल हासन यांचे महत्त्वपूर्ण विधान

वृत्तसंस्था/  चेन्नई 

 चित्रपटसृष्टी गाजविल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलेले अभिनेते कमल हानस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेसने द्रमुकसोबतची आघाडी संपुष्टात आणल्यास 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्याच्यासोबत हातमिळवणी होऊ शकते असे हासन यांनी म्हटले आहे. हासन यांनी फेब्रुवारी महिन्यात मक्कल निधी मय्यम हा राजकीय स्थापन केला आहे.

काँग्रेससोबत एमएनएमची आघाडी राज्याच्या जनतेसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते. परंतु याकरता काँग्रेसला द्रमुकसोबतची आघाडी संपुष्टात आणावी लागणार असल्याचे हासन एका मुलाखतीवेळी म्हणाले आहेत. हासन यांनी या पूर्वी देखील काँग्रेससोबत आघाडीचे संकेत दिले आहेत. या अगोदर जून महिन्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत तामिळनाडूच्या राजकीय घटनांवर चर्चा केली होती.

एमएनएमचे भ्रष्टाचाराविरोधात लढाई हे मुख्य उद्दिष्ट आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या कोणत्याही पक्षासोबत जाणे मी टाळेन. द्रमुक आणि राज्यातील सत्तारुढ अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा दावा कमल यांनी केला आहे. हासन यांनी पहिल्यांदाच उघडपणे द्रमुकला विरोध केला आहे. या अगोदर कावेरी नदीच्या मुद्यावर कमल यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत द्रमुक तसेच त्याच्या सहकारी पक्षांनी भाग घेतला नव्हता.

Related posts: