|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

तुळा राशीत रवि प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या हितानुसार निर्णय घ्यावा लागेल. दसऱयाच्या दिवशी तुम्ही तुमचे विचार सर्वांना पटवून देऊ शकाल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखीचा फायदा करून घ्या. संसारात शुभ समाचार मिळेल. वाद मिटवता येईल. मुलांची प्रगती होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा.  परीक्षेत यश येईल. नवरात्रीत तुमच्या देवीची आराधना करा.


वृषभ

तुळा राशीत सूर्य प्रवेश, चंद, मंगळ युती होत आहे. कायद्याच्या विरोधात जाऊन कोणतेही काम करू नका. वाद वाढवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तणाव वाढेल. आरोप होईल. धंद्यात खर्च वाढेल. फसगत होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा.  संसारात तडजोड करावी लागेल. वृद्ध व्यक्तीची काळजी वाटेल. कला, क्रीडा  क्षेत्रात नाराज होऊ नका. परिक्षेसाठी तयारी करा. कोर्टकेसमध्ये चिंता वाटेल.


मिथुन

तुळा राशीत सूर्य प्रवेश, बुध शुक्र युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महत्त्वाचे काम करून घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात तुमची लोकप्रियता वाढवता येईल. स्वत:च्या अधिकाराचा वापर जनतेच्या सुखासाठी करावा. त्याचाच फायदा दोघांनाही होईल. धंद्यात जम बसेल. नवे काम मिळेल. थकबाकी वसूल करा. दसऱयाच्या दिवशी  वाद होऊ शकतो. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेसमध्ये यश मिळवता येईल. घरातील व्यक्तींना खूष ठेवता येईल.


कर्क

तुळेत सूर्य प्रवेश व चंद्र, मंगळ युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात आक्रमक भूमिका घेतांना विचार करा. मनाविरुद्ध घटना घडू शकते. सहनशीलता ठेवा. धंद्यात काम टिकवा. अरेरावी करू नका. जवळची माणसे तुमच्याशी प्रेमाने वागतील. कला, क्रीडा क्षेत्रात स्पर्धा कठीण वाटेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. कोर्टकेसमध्ये चिंता वाटू शकते. परीक्षेसाठी जास्त अभ्यास करा. स्पष्टवक्तेपणाचा त्रास होईल.


सिंह

नवरात्रीच्या दिवसात आपल्या कुलदेवीची प्रार्थना करणे महत्त्वाचे असते. घरात बसूनही हे आपण करू शकतो. तुळेत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्यात चांगला फायदा होईल. जम बसेल. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्या पूर्तीकडे लक्ष द्या. लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास टिकवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. दसऱयाच्या दिवशी किरकोळ चिंता वाटेल.


कन्या

तुळा राशीत सूर्य प्रवेश, बुध,शुक्र युती होत आहे. धंद्यातील समस्या कमी होतील. मोठे काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. योजनांना पूर्ण करा. लोकांचा कल पाहून त्यानुसार त्यांना मदत करा., तुमचे कर्तृत्व वाढवा. नोकरी लाभेल. आळस करू नका. कला – क्रीडा क्षेत्रात चमकाल. लाभ मिळेल. शेअर्सचा अंदाज घेता येईल. कोर्टकेस संपवता येईल. शनिवारी विरोध सहन करावा लागेल.


तुळ

 तुमच्याच राशीत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. तुमच्या कार्यातील अडचणी  हळूहळू कमी होतील. धंद्यात लक्ष द्या. काम वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात दसऱयानंतर चांगला बदल होईल. तुमचे महत्त्व पटेल. तुम्ही स्थिर रहा. कोणतेही मतप्रदर्शन करू नका. कला, क्रीडाक्षेत्रात प्रगती होईल. कोर्टकेसमध्ये यशाची आशा वाढेल. नोकरीसाठी प्रयत्न करत रहा. परीक्षेसाठी यशाचा मार्ग मिळेल. संसारात तणाव कमी होईल.


वृश्चिक

साडेसाती सुरू आहे. मनावर, शरीरावर दडपण येईल. कुठेही उतावळेपणा करू नका. प्रेमात तणाव होऊ शकतो. तुमचे मानसिक  संतुलन कायम ठेवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तटस्थ रहावे लागेल. तुळेत सूर्य प्रवेश, चंद्र, मंगळ युती होत आहे. तुम्ही ठरवाल तसेच घडेल, असे समजू नका. तडजोड करा. धंद्यात लक्ष द्या. हिशोब नीट करा. भावनेच्या भरात चूक होऊ शकते. कला, क्रीडा स्पर्धेत हिम्मत ठेवा. परिक्षेसाठी अभ्यासात आळस करू नका. खाण्यापिण्याची काळजी घ्या.


धनु

रविवारी किरकोळ तणाव व चिंता निर्माण होऊ शकते. नवरात्रीत तुमच्या कुलदेवीची प्रार्थना करा. तुळेत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. धंद्यात चांगला निर्णय घेता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात मागे राहू नका. जनतेच्या उपयोगी पडल्याशिवाय तुमचे महत्त्व कसे वाढणार भ्रमात राहू नका. वेळ महत्त्वाची आहे. कला, क्रीडा स्पर्धेत यश येईल. कोर्ट केसमध्ये जिद्द ठेवा. यश खेचता येईल. विद्यार्थ्यांनी सर्व अभ्यासावर लक्ष द्यावे.


मकर

सोमवार, मंगळवारी अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. घाईत निर्णय घेऊ नका. दसऱयापासून तुमचा उत्साह वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यातील अडचणी कमी होतील. योजनांना गती येईल. तुळेत सूर्य प्रवेश, चंद, मंगळ युती होत आहे. प्रेमाने सर्वांना एकत्र करता येईल. घरातील समस्या मोठी नसेल. निर्णय घेऊ शकाल. धंद्यात वाढ होईल. थकबाकी मिळवा. स्पर्धेत टिकता येईल. परीक्षेसाठी मेहनत घ्या. यश येईल.


कुंभ

तुळेत रवि प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. बुधवार, गुरुवारी राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. तुमच्यावर आरोप येईल. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. दुखापत संभवते. धंदा वाढेल. थकबाकी मिळेल. नोकरीत ताण असेल. कला, क्रीडा क्षेत्रात मेहनत घ्या. अपयशाने खचू नका. कोर्टकेस पुढे टाका. परिक्षेसाठी अभ्यास करा. वरि÷ांना दुखवू नका.


मीन

गुरुबल प्राप्त झाले तरी तुम्हाला कुठेही उतावळेपणा करून चालणार नाही. नोकरीत सावधपणे निर्णय घ्या. तुळेत सूर्य प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात  विरोधक एकत्र येऊन तुम्हाला त्रस्त करण्याचा प्रयत्न करतील. मैत्रीत दुरावा होईल. स्वत:च्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. वृद्ध व्यक्तीसाठी धावपळ होईल. धंद्यात सावध रहा. कला, क्रीडा स्पर्धेत कष्ट पडतील. जवळच्या माणसांना दुखवू नका. अभ्यासात आळस नको.

Related posts: