|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » ड्रायव्हिंग लायसन्स अन् आरसीबुक देशभरात एकसारखेच…?

ड्रायव्हिंग लायसन्स अन् आरसीबुक देशभरात एकसारखेच…? 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी जुलैपासून देशातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) आणि गाडी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (नोंदणी प्रमाणपत्र) एकसारखेच असणार आहेत. त्यांचा रंग, लूक आणि डिझाईन तसेच सिक्मयुरिटी फिचर्स सर्व काही एकसारखेच असणार आहेत. या ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसीमध्ये मायक्रोचीप आणि क्मयूआर कोड सुद्धा असणार आहेत.

ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी हे मेट्रो आणि एटीएम कार्डसारखे नियरफील्ड कम्युनिकेशन (NFC) असणार आहेत. ट्रफिक संदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना या नव्या कार्डद्वारे लवकर मिळू शकतील. दिव्यांग चालकांसाठी खास डिझाईन बनवण्यात आली आहे. प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये असणार आहे. रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱयाने या संदर्भात माहिती दिली आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रदुषणासंबंधी चाचणी करायची असेल तर त्याला गाडी मालकांची परवानगी घ्यावी लागत होती, परंतु, आता त्याची गरज नाही, असेही या अधिकाऱयाने सांगितले. देशात दररोज 32000 ड्रायव्हिंग लायसन्स दिले जातात किंवा त्यांचे नुतनीकरण केले जाते. देशभरात दररोज 43000 गाड्यांची नोंदणी केली जाते. या नवीन ड्रायव्हिंग लायसन्समुळे 15 ते 20 रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. ट्रफिक पोलिसांनी कार्डमधील नवीन क्मयुआर कोड स्कॅन करताच त्यांना गाडी चालकाची सर्व माहिती मिळू शकणार आहे.