|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » मनोरंजन » सलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास

सलीम-सुलेमान यांचा मराठीत प्रवास 

आजवर बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायक आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहर मराठी चित्रपटात उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मांदियाळीत हिंदी चित्रपटसफष्टीतील आणखी एक आघाडीची संगीतकार जोडी मराठी चित्रपटसफष्टीत पदार्पण करतेय. गायक-संगीतकार सलीम-सुलेमान मर्चंट या दोघांचीही आपली एक खास ओळख आहे. या जोडीने हिंदी चित्रपटांसाठी गायक-संगीतकार म्हणून काम केले आहे. हिंदी चित्रपटसफष्टीतील ही प्रसिद्ध जोडी आता मराठी चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. शशांक उदापूरकर दिग्दर्शित प्रवास या आगामी मराठी चित्रपटात त्यांच्या संगीताची जादू अनुभवता येणार आहे.

 चक दे इंडिया, अब तक छप्पन, दोस्ताना, धूम 2, पॅशन, सिंग इज किंग, मुझसे शादी करोगी, आजा नचले, इक्बाल, हम तुम यासारख्या असंख्य गाजलेल्या चित्रपटातील सलीम-सुलेमान यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर गारूड केले आहे. आता मराठीतही आपला जलवा दाखवायला ते सज्ज झाले आहेत. प्रवास चित्रपटातील गाण्याच्या निमित्ताने संगीतकार सलीम-सुलेमान, गायक सोनू निगम आणि  गीतकार गुरु ठाकूर हे कलेच्या प्रांतातील तीन गुणी कलावंत एकत्र आले आहेत. या गाण्याचं रेकोर्डिंग नुकतंच पार पडले. ‘प्रवास’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसफष्टीत पदार्पण करणारे सलीम-सुलेमान सांगतात की, आमच्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता. यानिमित्ताने आम्ही मराठी चाहत्यांसाठी गीत-संगीताची अनोखी पर्वणी देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे. ओम छंगानी फिल्म्स निर्मित प्रवास या चित्रपटाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली आहे. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे.

Related posts: