|Saturday, March 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पंचकूला येथे रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा

पंचकूला येथे रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा 

वृत्तसंस्था/ पंचकूला

हरियाणाच्या पंचकूला शहरातील सेक्टर 5 मध्ये विजयादशमीच्या दिवशी (19 ऑक्टोबर) जगातील सर्वाधिक उंच रावणाच्या पुतळय़ाचे दहन केले जाणार आहे. रावणाच्या पुतळय़ाची उंची 210 फूट आहे. श्री रामलीला क्लब बराडाचे अध्यक्ष तेजिंद्र सिंग चौहान यांनी याची निर्मिती केली असून याकरता आलेल्या खर्चासाठी त्यांनी स्वतःची जमीन देखील विकली आहे.

रावणाच्या या पुतळय़ाच्या शिराचे वजन साडेतीन क्विंटल आहे. 10 डोकी जोडली गेली असती तर याचे एकूण वजन 35 क्विंटल झाले असते. इतके वजन हवेत लटकविले जाऊ शकत नसल्याने याला एकच शिर जोडण्यात आले आहे. हा पुतळा 40 जणांच्या पथकाने 5 महिन्यात तयार केला असून निर्मितीकरता सुमारे 30 लाख रुपयांचा खर्च आल्याचा दावा तेजिंद्र यांनी केला.

1987 मध्ये 5 मित्रांनी मिळून पहिल्यांदा 20 फूटांचा रावण तयार केला असता लोकांकडून कौतुक झाले होते. यातूनच प्रेरणा मिळाल्याने त्यानंतर दरवर्षी पुतळय़ाची उंची वाढतच गेली. रावणाच्या या पुतळय़ात 5 लाख रुपयांचे पर्यावरणपूरक फटाके ठेवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

 

पुतळय़ाची वैशिष्टय़े

50 फूटांची तलवार

10 फूटांचे छत्र मुकुटावर

25 फूटांचा चेहरा, मानेसह

50 फूटांचा मुकूट

48 फूट लांबीची मिशी

85 फूटांचे शिर

35 फूटांचे पाय

Related posts: