|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कारमध्ये आढळली 59 हजाराची दारू

कारमध्ये आढळली 59 हजाराची दारू 

कसालला तपासणीसाठी थांबविली होती कार : चालक झाला पसार

प्रतिनिधी / ओरोस:

मुंबईगोवा महामार्गाने गोवा ते कणकवली जाणारी स्वीफ्ट कार तपासणीसाठी कसाल येथे थांबविली असता त्यामध्ये 59 हजाराची गोवा बनावटीची दारु आढळून आली. गोवा बनावटीच्या दारुची बिगर परवाना दारु वाहतूक होत असल्याने ओरोस पोलिसांच्या साहय़ाने दारुसह कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती महामार्ग पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव यांनी दिली.

14 ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गोव्याकडून कणकवलीकडे जाणारी स्वीफ्ट कार मुंबईगोवा महामार्गावरील कसाल येथील महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्रावरील पोलिसांनी तपासणीसाठी थांबविली होती. यावेळी तपासणी दरम्यान या गाडीत गोवा बनावटीची 59 हजार रुपयांची दारु असल्याचे दिसून आले.

यावेळी वाहन तपासणीसाठी थाब्ंाविले गेल्याने अंधाराचा फायदा घेत वाहन चालक पसार झाला. दरम्यान गाडीत गोवा बनावटीची दारु आढळल्याने याबाबतची माहिती ओरोस पोलीस स्थानकात देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक झेंडे यांच्यासह सहकाऱयांनी कसाल येथे जाऊन मुद्देमालासह दीड लाखाची कार जप्त केली. याबाबत ओरोस पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.