|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकविश्वास प्रतिष्ठान यांच्यातर्फे 19 रोजी ‘कला चैतन्य’ चित्र प्रदर्शन

लोकविश्वास प्रतिष्ठान यांच्यातर्फे 19 रोजी ‘कला चैतन्य’ चित्र प्रदर्शन 

प्रतिनिधी/ पणजी

लोकविश्वास प्रतिष्ठान यांच्यातर्फे जायंन्ट गुप ऑफ पणजी आणि इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या सहाय्याने येत्या दि. 19 ते 21 ऑक्टोबर दरम्यान ‘कला चैतन्य’ या चित्रपद्रर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष मुलांनी रेखाटलेल्या चित्रांचे हे प्रदर्शन मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात स. 10 ते सायं. 6.30 वाजेपर्यंत हे प्रदर्शन लोकांसाठी खुले असणार आहे. अशी माहीती लोकविश्वास प्रतिष्ठापन संस्थेचे सचिव राज वैद्य यांनी दिली.

पणजी येथे आयोजित पत्रकार परीषदेत राज वैद्य यांनी ही माहीती दिली. यावेळी त्यांच्यासोबत जायंन्ट ग्रुपचे दिपक डिसोझा, राजन कामत, विनोद सतरकर व प्रकाश कामत उपस्थित होते.

आमची संस्था गेली 37 वर्षे दिव्यांग मुलांच्या शिक्षण व पूनर्वसनाचे कार्य करीत आहे. विशेष मुलांचे सुप्त गुण हेरुन त्यांना क्रिडा, नृत्य, अभिनय, वाद्य, संगीत, कला, शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्यांना व्यसपिठ उपलब्ध करुन देण्याचे काम करतो. याचाच एक भाग म्हणून आम्ही हे विक्री प्रदर्शन भरविले आहे. या प्रदर्शनात 60 विशेष मुलांनी रेखाटलेले जवळपास 100 पेंटींग्स उपलब्ध असणार आहे. अशी अधिक माहीती वैद्य यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 19 रोजी सायं 4 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कलाकार नागेशराव सरदेसाई, इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष  संजय हरमलकर व पत्रकार प्रकाश कामत उपस्थित असणार आहे.

Related posts: