|Friday, November 15, 2019
You are here: Home » Top News » हेरगिरीप्रकरणी मेरठमधून लष्कराच्या जवानाला अटक

हेरगिरीप्रकरणी मेरठमधून लष्कराच्या जवानाला अटक 

ऑनलाईन टीम / मेरठ :

उत्तर प्रदेशच्या मेरठ कँटोनमेंटमधून लष्कराच्या एका जवानाला अटक करण्यात आली आहे. या जवानावर हेरगिरी केल्याचा आरोप आहे. लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या या जवानाची सध्या कसून चौकशी केली जात आहे. या जवानाने नेमकी कोणासाठी हेरगिरी केली, याचा तपास सध्या सुरू आहे.

काही दिवसांपूर्वीच ब्राह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेला पुरवल्याबद्दल अभियंता निशांत अग्रवालला अटक झाली आहे. निशांतला सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. ऑफिशियल सिपेट ऍक्टचा भंग केल्याप्रकरणी त्याची चौकशी केली जात असून आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. निशांत ब्राह्मोस एरोस्पेसमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. त्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयला पुरवली. निशांतच्या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या. फेसबुकवर एका मुलीसोबत चॅट करताना त्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची अतिशय गोपनीय उघड केली. या मुलीचे अकाऊंट पाकिस्तानातले आहे. निशांतला पाकिस्तान हस्तकाकडून 30 हजार अमेरिकन डॉलर महिना पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. कॅनडात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, या विचाराने त्यान संवेदनशील माहिती पाकिस्तानी हस्तकाला पुरवली. याबद्दलचे पुरावेदेखील तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत.

Related posts: