|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात

काश्मीरमध्ये 3 दहशतवादी ठार ; 4 एके 47 ताब्यात 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

बारामुल्ला जिह्यातील बोनिआर परिसरात, एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांचा लष्कराने खात्मा केला असून त्यांच्याकडील 4 एके 47 ही जप्त केले आहेत. दरम्यान या परिसरात लपलेल्या अजूनही काही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

बोनिआर परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना गुरुवारी संध्याकाळी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी लष्काराने हा परिसर घेरून एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. काश्मीरमध्ये आता 250 तळांवर एकूण 300 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय सैनिकांनी मोहीम छेडली असून सीमेपलीकडून दहशतवादी भारतात येणार नाही याची काळजी घेतली जाते आहे.