|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आसाम रायफल्सकडून म्यानमारला 15 घोडे भेट

आसाम रायफल्सकडून म्यानमारला 15 घोडे भेट 

इंफाळ

 भारताच्या आसाम रायफल्स या सैनिक तुकडीने म्यानमार सैन्याला 15 उत्कृष्ट प्रशिक्षित घोडय़ांची भेट दिली आहे. मणिपूरच्या तंगनौपाल जिल्हय़ात मोरेह या स्थानी झालेल्या शानदार कार्यक्रमात ही अनोखी भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन आसाम रायफल्सने गुरूवारी केले होते. दोन्ही देशांमध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या अश्वांना उत्तराखंडातील हेमपूर येथे प्रशिक्षित करण्यात आले आहे. तेथूनच त्यांना मोरेह येथे आणण्यात आले. हेमपूरला अश्वप्रशिक्षणाची 150 वर्षांची परंपरा आहे. 2017 मध्येही असे 15 अश्व म्यानमारला भेट देण्यात आले होते.