|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » ब्रह्मपुत्रा : एनडीआरएफची 32 पथके तैनात

ब्रह्मपुत्रा : एनडीआरएफची 32 पथके तैनात 

पूरसंकटाची भीती : आसाम, अरुणाचलमध्ये विशेष खबरदारी

वृत्तसंस्था / गुवाहाटी

 भूस्खलनामुळे तिबटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह प्रभावित झाल्याने एका कृत्रिम सरोवराची निर्मिती झाली आहे. या सरोवराच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यामंध्ये एनडीआरएफची 32 पथके तैनात करण्यात आली आहेत.

पूर येण्याची शंका पाहता अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या जिल्हय़ांमध्ये एनडीआरएफची 32 पथके तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भूस्खलनानंतर तिबेटमधून सुमारे 6000 जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आल्याचे चीनच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सांगितले आहे. चीन भारताला या संभाव्य संकटाबद्दल सातत्याने तपशील पुरवत असल्याचे समजते. काँग्रेसचे खासदार निनोंग एरिंग यांनी पत्र लिहून विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि जलसंपदा राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे.

चीननुसार भूस्खलनानंतर सरोवराच्या पातळीत 40 मीटरची वाढ झाली आहे. हे सरोवर आता भारतासाठी धोकादायक ठरत चालले आहे. अरुणाचलच्या पूर्व सियांग जिल्हय़ात प्रशासनाने लोकांना नदीकाठावर जाण्यास मज्जाव केला आहे.