|Saturday, February 22, 2020
You are here: Home » मनोरंजन » छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंची होणार भेट

छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंची होणार भेट 

छत्रपती शिवाजी महाराजांनी जगातील पहिल्या लोकाभिमुख स्वराज्याची स्थापना केली. शून्यातून स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं. पण, त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या मर्द मावळय़ांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा.

संभाजी महाराजांबद्दल आजवर अनेकदा इतिहासकारांकडून, बखरकारांकडून अनेक कथा रंगवल्या गेल्या आहेत. पण, त्या सगळय़ा गोष्टींमागचा खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचे काम झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ही मलिका यशस्वीरित्या करत आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून शंतनू मोघे आणि संभाजी महाराजांच्या भूमिकेतून डॉ. अमोल कोल्हे यांनी या दोन्ही व्यक्तिरेखा उत्तमरित्या साकारल्या आहेत. प्रेक्षकांचाही या मालिकेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग आता या मालिकेतून आपल्यासमोर येणार आहे. दिलेरखानाच्या छावणीतून निघाल्यानंतर तब्बल तीन वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज शंभूराजे या पितापुत्रांची भेट पन्हाळगडावर घडली होती. त्या दोघांच्याच आयुष्यातील नव्हे तर शिवकालीन इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून या भेटीचा उल्लेख केला जातो. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील ही शेवटची भेट असल्याने ती जेवढी राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची होती तेवढीच भावनिकदृष्टय़ाही महत्त्वाची होती. लवकरच ही ऐतिहासिक घटना आपल्याला स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

 या भेटीत शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यात काय चर्चा होणार? सोयराबाई संभाजी महाराजांना स्वीकारणार का? यापुढे दिल्ली आणि रायगडावरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा मिळणार? आनाजी दत्तोंची या सगळय़ात काय भूमिका असेल? हे सगळं येत्या काही भागांमध्ये जाणून घेता येणार आहे. 23 ते 27 ऑक्टोबरदरम्यान ही ऐतिहासिक भेट स्वराज्यरक्षक संभाजीमध्ये पाहायला मिळणार आहे.

Related posts: