|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तैवानमध्ये रुळावरून घसरली रेल्वे, 17 जणांचा मृत्यू

तैवानमध्ये रुळावरून घसरली रेल्वे, 17 जणांचा मृत्यू 

तैपेई

 तैवानच्या दक्षिणपूर्व भागात झालेल्या रेल्वे दुर्घटनेत 17 जणांना जीव गमवावा लागला असून 101 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना रेल्वे रूळावरून घसरल्याने झाल्याचे सांगण्यात आले. पुयामा एक्स्प्रेस 300 प्रवाशांसह ताइतुंग शहरासाठी प्रवास करत असताना 4.50 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. तैवानचा ग्रामीण प्रांत तुंगशान येथे ही दुर्घटना घडली असून 17 प्रवाशांचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर जखमींना चार वेगवेगळय़ा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. तैवानच्या न्यू तैपेई शहरातून ही रेल्वेसेवा चालत असून सुरक्षित असल्याचे मानले जाते. सुरक्षेची खबरदारी घेतली जात असून देखील दुर्घटना घडल्याने याच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले.